Published On : Sat, Sep 18th, 2021

भाजयुमोतर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य नवभारत मेळाव्याचे उद्घाटन..!

नागपुर: माननीय प्रधानमांत्री श्री नरेंद्र मोदी याांनी गेल्या 7 वर्षात केलेल्या कामाचे प्रदर्शन व मोदी सरकारने युवकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती मिळण्याकरीता भाजयुमो तर्फे पंतप्रधानांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्य नव भारत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा संपुर्ण महिनाभर चालणार आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा नागपुर शहर अध्यक्ष आ. प्रविणजी दटके यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी प्रामुख्याने भाजपा शहर महामंत्री संजय बंगाले, सुनील मित्रा, पालक रामभाऊ आंबूलकर, भाजयुमो शहर अध्यक्ष परेंद्र पटले,भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजपा मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, सतिश वडे, नगरसेविका परिणिता फुके, अमर बागडे, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे. शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनीष मेश्राम, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, सनी राऊत, पुष्कर पोशेट्टीवार, सागर घाटोळे घनश्याम ढाले, ईशान जैन, संकेत कुकडे, अमेय विश्वरूप, डिम्पी बजाज, प्रसाद मुजुमदार, आसावरी काळे, मनमित पिल्लारे, गौरव हरडे, प्रणव घुगरे, आशिष घरड, आशिष मिश्रा, रोहित त्रिवेदी, समीर मंडले, राहुल कृष्णानी, संदिपन शुक्ला, वरून गजभिये, सागर यादव, राहुल ताकवात, विक्की पांडे उपस्थित होते.

या सोबतच संपुर्ण देशात भाजयुमोतर्फे सेवा आणि समर्पण अभियान अंतर्गत नव भारत मेळाव्या सह २५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर, २ ओक्टोंबर रोजी आझादी का अमृत महोत्सव तसेच स्वच्छता से सन्मान अभियान, २५ सप्टेंबर रोजी मोदीजींचा अंत्योदय व १७ सप्टेंबर ते २ ओक्टोंबर दरम्यान नमो प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.


या आगामी संपुर्ण कार्यक्रमाकरीता भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात महानगरस्तरावर काही विषेश जवाबदार्यां देण्यात आलेल्या आहेत. शहर संयोजक अमोल तिडके, शहर सह संयोजक मनिष मेश्राम, भाजयुमो नव भारत मेळावा संयोजक अमेय विश्वरूप, सह संयोजक आशिष घारड, सागर गंधर्व, रोहीत त्रिवेदी, रक्तदान शिबीर संयोजक विक्रम ग्वालबंशी, सह संयोजक विक्की पांडे, प्रतिक टेटे, नमो प्रश्नमंजुषा स्पर्धा संयोजक संकेत कुकडे, सह संयोजक गौरव हरडे व सहाही मंडळाचे विद्यार्थी प्रमुख, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम व आर्मीच्या शहीद जवानांच्या कुटुंबाना भेट देण्याकरीता संयोजक डिम्पी बजाज, सह संयोजक आसावरी काळे, पायल राजपुत व सहाही मंडळांच्या युवती प्रमुख, मोदीजींच्या अंत्योदय कार्यक्रम संयोजक हिमांशु शुक्ला, सह संयोजक हर्षल वाडेकर, सोनु वर्मा, स्वच्छता से सन्मान अभियान संजोजक ॲड. हर्षल तिजारे, सह संयोजक शहराचे सहा संपर्क प्रमुख व पियुष बोईनवार हे आहेत.