नागपुर – नागपूर महानगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा उईके यांची जयंती दिनांक 30 जुलै 2022 रोजी गोंड राजे बक्त बुलंद शहा उईके पुतळा,सिव्हील लाईन नागपूर येथे प्रतिमे भोवती सजावट करण्यात आले.पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी गोंडी सांस्कृतिक नृत्य सादर करुन गोंडी पारंपारिक वाद्य वाजवत रंगीन फटाके फोडून यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला.
Featured Products
याप्रसंगी मा.अशोक वाहणे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर, गोंडवाना गणतंत्र पार्टी,गोंडवाना गणतंत्र पार्टी महीला प्रकोष्ठ, गोंगपा युवा मोर्चा यावेळी मा. निकोरे मॅडम ( राष्ट्रीय अध्यक्षा)राजेश ईरपाते ( युवा प्रदेशाध्यक्ष ) गंगाताई टेकाम ( जिल्हा अध्यक्षा नागपूर) सौरभ मसराम ( युवा जिल्हा अध्यक्ष नागपूर) सुनीता ताई ऊईके (संघटक नागपूर जिल्हा) दिनेश शिडाम ( शहर अध्यक्ष नागपूर) योगिता ताई मसराम ( शहर अध्यक्ष नागपूर) विजय मसराम ( कुवॉरा भिवसन पालखी संयोजक ) सतिश नाईक ( युवा शहर अध्यक्ष) उमेश टेकाम( नागपूर संघटक महामंत्री ) , प्रविण मडावी ( युवा उपाध्यक्ष) मसराम भाऊ ( सामाजिक कार्यकर्ता) रोशनी ऊईके ( सामाजिक कार्यकर्ता) ज्ञानेश्वर कुमरे ( सामाजिक कार्यकर्ता) व समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.









