Published On : Fri, Dec 13th, 2019

बर्डी ते भांडेवाडी बस सेवेचा शुभारंभ

Advertisement

उपमहापौर मनीषा कोठे यांनी दाखवली हिरवी झेंडी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत बर्डी ते भांडेवाडी रेल्वे स्टेशन (मार्गे रेल्वे स्टेशन) बस सेवेचा शुभारंभ शुक्रवारी (ता.13) ला करण्यात आला. उपमहापौर मनीषा कोठे यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी विधी समिती सभापती अड धर्मपाल मेश्राम, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सुरज झोडापे, मुकेश शेंडे, अशोक देशमुख, राजेश शेळके, राजेश संगवार प्रामुख्याने उपस्थित होते.


बर्डी ते भांडेवाडी ही बस सेवा सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिक वारंवार मागणी करत होते. विधी समिती सभापती व नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी पुढाकार घेत ही बस सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली. या मागणीनुसार ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

बर्डी ते भांडेवाडी ही बस भांडेवाडी रेल्वे स्टेशन मार्गे बिडगाव फाटा, स्वामीनारायण मंदिर, खरबी, इश्वरनगर, भांडेप्लॉट चौक, सक्करदरा चौक, क्रिडा चौक, मेडिकल चौक, बस स्टॅंड, मानस चौक अशा मार्गाने जाणार आहे. या बस चे तिकीट दर 29 रूपये तर अर्धे तिकीट 15 रूपयाला आहे. मोरभवन येथून ही बस सकाळी 7.50, 9.35, 11.40, 13.25, 15.10, 16.55, 18.35 या वेळेत सुटणार आहे तर भांडेवाडी रेल्वे स्टेशन येथून ही बस सकाळी 8.40,10.25,12.30,14.15,16.00,17.45 ला सुटणार आहे.

या बस सेवेचा उपयोग स्थानिक नागरिकांनी करावा, असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे रामराव मातकर, सुकीर सोनटक्के, सुनील मुश्रीफ, योगेश नवघरे, मुकेश अंधारे, रोहित मेंढे, नवनीत रामटेके, प्रवीण नायक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement