
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर समोर आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचे म्हटले असून १६ आमदारांनाही पात्र ठरविले.
शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार मलाच असल्याचे सांगत नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना बहाल केला आहे. भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड योग्य असून त्यांचा व्हीप वैध असल्याचे तसेच १६ आमदारही केवळ बैठकीला हजर नाहीत म्हणून अपात्र करता येणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.
विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ठाकरे व शिंदे गटातील आमदारांच्या उपस्थितीत या निकालाचे वाचन करण्यात आले. १२०० पानांच्या या निकालपत्रातील महत्वाच्या मुद्द्याचे राहुल नार्वेकर यांनी वाचन केले.
निकालाचे वाचन करतांना नार्वेकर म्हणाले की,निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. या निर्णयाचा आधार घेऊन मी निकाल देत आहे. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. कोणताही निर्णय पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणी घेणार व तोच फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. तसेच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा अधिकार नसल्याचेही राहुल नार्वेकरांनी नमूद केले.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




