
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलिस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. याच दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. जिथे पोलिसांना १.३५ कोटी रुपये रोख सापडले. पैसे सापडताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ही रक्कम कोणाची आहे, अशी विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. निवडणुकीच्या वेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.








