Published On : Wed, Mar 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सीबीआयची मोठी कारवाई;महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी दिल्ली ते मध्यप्रदेश-छत्तीसगडपर्यंत ६० ठिकाणी छापे

Advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापे टाकले. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी सीबीआयची ही मोठी कारवाई मानली जात आहे. या बेकायदेशीर प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा, पोलिस अधिकारी, महादेव बुकचे प्रमुख अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींच्या घरांवर धाड टाकण्यात आली आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅप हे रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांनी प्रमोट केलेले एक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म आहे. हे दोघेही सध्या दुबईमध्ये आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवर्तकांनी त्यांचे बेकायदेशीर नेटवर्क सुरळीत चालावे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण शुल्क म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज सकाळी सीबीआयने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरांवरही छापे टाकले. महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित एका प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे.

महादेव अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांना इंटरपोलने रेड कॉर्नरे नोटीस जारी केल्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये दुबईतून अटक करण्यात आली. ईडीच्या विनंतीवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान महत्त्वाचे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

हा गुन्हा आधी आर्थिक गुन्हे शाखेने रायपूरमध्ये दाखल केला होता. पण, नंतर छत्तीसगड सरकारने सखोल चौकशीसाठी हा खटला सीबीआयकडे दिला. सीबीआय आता या प्रकरणात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर आरोपींचा सहभाग आहे का, याअनुषंगाने तपास करत आहे.

Advertisement
Advertisement