
नागपूर/कन्हान: ग्राम पंचायत साटक येथे खनिज प्रतिष्ठान निधी सन २०१७-१८ अंतर्गत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या योगदानाने पांधन रस्ता व रस्ता बांधकामाचे भुमिपुजन सोहळा थाटात संपन्न झाला.

दोन रस्ता बांधकामाचे भुमिपुजन शुक्रवार दि. १८मे२०१८ ला सायंकाळी ६ वाजता ग्राम पंचायत कार्यालय साटक येथे मा. डी.एम. रेडडी आमदार रामटेक यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले .
या प्रसंगी प्रमुख अतिथी पारशिवनी तालुका कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष मा. दयाराम भोयर,साटक सरपंचा सिमाताई यशवंतराव उकुंडे, उपसरपंच गजानन बापुराव वांढरे, ग्रा.प.सदस्य. तरूण बर्वे, दिपक मोहनकर, सु़भाष बिरो, सकुंतला मेश्राम, शोभा देशमुख, मंगला श्रावनकर, निर्मला बावनकर, गिता कंभाले. रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस सचिव रविंद्र गुडधे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भुमिपुजन समारंभ संपन्न झाला.
या पांधन रस्ता व रस्ता बांधकामाच्या भुमिपुजन समारंभाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आत्मारामजी उकुडे, रमेशजी वाढंरे, कवडुजी मोहनकर, भिमरावजी वाडीभस्मे, निकेश हारोडे, सुभाष मोहनकर, ईश्वर हिगणकर, यादोरावजी बबुरे, प्रेमचंद चामट तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ मंडळी हयानी सहकार्य केले . विकास कामाकरिता मोठय़ा संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती .








