Published On : Thu, Jan 18th, 2018

अंबाझरी ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

Advertisement


नागपूर: अंबाझरी तलावालगत असलेल्या ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १८) सकाळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेवक अमर बागडे, भाजपचे दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे महामंत्री श्रीपाद (छोटू) बोरीकर, प्रभाग अध्यक्ष विजय होले आदी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांच्याकडे अंबाझरी वॉकिंग ट्रॅकसंदर्भात अनेक तक्रारी येतो होत्या. सकाळी फिरणाऱ्या नागरिकांना तेथे धुळीचा सामना करावा लागतो. या तक्रारींची दखल घेत महापौर नंदा जिचकार यांनी महापौर निधीतून तीन लक्ष रुपये देऊन ट्रॅकचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याबद्दल अंबाझरी परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी भाजपचे कार्यकर्ते मनीष गेडाम, विकास वाके, प्रकाश राजहंस, मनोज पोद्दार, राजू मोघे, प्रीतम ढोके, सुबोत, आनंद गुप्ता, कुणाल तायवाडे, मुकुंद मस्के, धीरज मेश्राम, किशोर हाढाव, मनोज देशपांडे आदी उपस्थित होते.