Published On : Wed, Jul 28th, 2021

दिघोरी येथील सेनापती नगर उद्यानातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील विविध भागामध्ये नाग आणि पिवळी नदीलगत असलेल्या सुमारे १२ बगिच्यांमध्ये छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारून त्यातून शुद्ध होणाऱ्या पाण्याच्या वापर बगिच्यांसह क्रीडा मैदाने व बांधकामासाठी करण्यात येणार आहे. या कार्यांतर्गत बुधवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते दिघोरी दहन घाटाजवळील सेनापती नगर उद्यानातील सांडपाणी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विजय(पिंटू)झलके, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) डॉ. श्वेता बॅनर्जी, रामभाऊ आंबुलकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरामध्ये एकूण १२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. १२ पैकी चार प्रकल्पाचे भूमिपूजन आतापर्यंत झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने हे १२ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, एकाचवेळी असे १२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरले आहे, असे महापौरांनी सांगितले.

जपानच्या एका कंपनीच्या माध्यमातून नागपुरात सदर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. प्रकल्पाची क्षमता पाच हजार लिटर प्रतिदिन एवढी आहे. या प्रकल्पामुळे शहरातील बगिच्यांना पुरेसे पाणी मिळेल शिवाय शहरातील क्रीडा मैदाने व बांधकाम कार्यासाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्याकरिता असणाऱ्या शुद्ध पाण्याची बचत होईल. नदीमध्ये जाणारे सांडपाणी व त्यात असलेल्या घाणीचे प्रमाणही यामुळे कमी होउ शकणार आहे. एकाच प्रकल्पाच्या माध्यातून असे अनेक उद्देश साध्य होणार आहेत. नागपूर शहरासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे असून स्वातंत्र्य दिनापर्यंत नागपूर शहरातील किमान ३ ते ४ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येईल, असा संकल्पही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement