Published On : Tue, Oct 27th, 2020

कामगार कॉलनीतील सिमेंट रस्त्याचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर : लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग ३७‘अ’ मधील सुभाषनगर कॉमगार कॉलनीमध्ये सिमेंट रस्त्याचे मंगळवारी (ता.२७) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक तथा मनपाचे शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, संपर्क प्रमुख नितीन महाजन, प्रभाग ३७ ‘अ’चे अध्यक्ष विवेक मेंढी, अनुसया गुप्ता, साहेबराव मनोहरे, प्रभाग ३७ ‘ब’चे अध्यक्ष नंदू मानकर, शालिक कडू, सुनील राऊत, माणिकराव मेश्राम, सुनीता हिंगवे, शिला कहाते, पिंकी दुबे, सुशीला भोयर, रेणुका सुखदेवे, सुमित्रा भोसले, कावेरी मारके, अंकित दास, सुनीत सोनडवले, आशुतोष भगत, अनिकेत सोनडवले, सुनील, मधुर हावरे, तुषार बोकने आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रभाग ३७ ‘अ’चे नगरसेवक तथा मनपाचे शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने यांच्या विशेष प्रयत्नाने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून १८ लक्ष रुपयांचे सिमेंट रोड कार्य केले जाणार आहे.

Advertisement

दलीत वस्ती निधी अंतर्गत कामगार कॉलनी तुकडोजी नगर मेन रोड ते साहेबराव मनोहरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने हे कार्य सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी स्थानिक नगरसेवक तथा मनपाचे शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement