Published On : Mon, Aug 19th, 2019

किरात समाजाचा भुजलियॉ स्नेह मिलन कन्हान ला थाटात संपन्न

कन्हान : – किरात समाज कन्हान -कांद्री व्दारे रक्षाबंधना निमित्त भुजलियॉ सजावट सह विविध कार्यक्रमाने कन्हान ला भुजलियॉ स्नेहमिलन कन्हान ला थाटात संपन्न करण्यात आला.

शुक्रवार (दि.१६) ला सायंकाळी ४ वाजता तुकाराम नगर कन्हान येथे किरात समाजाच्या तरूणी व महिला सुंदर रंग बिरंगी वस्त्र परिधान करून सजावट केलेल्या भुजलियॉसह उपस्थित झाल्या त्यांचे रामराव लुहुरे यांनी स्वागत केले. महिला परिक्षकांनी सहा सुशोभित भुजलियॉंची निवड केली. तद्नंतर वाज्यागाज्याच्या गर्जरात तारसा रोडने मिरवणुक ६ वाजता इंदिरा नगर पाणी टाकीजवळ पोहचुन भुजलियॉचे विसर्जन करण्यात आले.

रात्री ८ वाजता डोणेकर सभागृहात किरात समाज भुजलियॉ स्नेहमिलन कार्यक्रमाचे मा नारद दारोडे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी मा शरद डोणेकर माजी उपाध्यक्ष जि प नागपुर, मा गेंदलाल काठोके सभापती आरोग्य व स्वच्छता न प कन्हान, अशोक खंडाईत, नरेश गडे, राजुजी काठोके, राधेश्याम हारोडे, मनोहर बादुले, माधव काठोके, पंचम कारोंडे, घनराज हारोडे, लक्ष्मी गडे, चंपा दारोडे आदी प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलित करून उदघाटन करण्यात आले. भरतनाटयम उपविजेती कु शर्वरी लुहुरे च्या नुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.

जेष्ठ नागरिक सुमित्रा हारोडे व निलकंठ लुहुरे यांचा सत्कार करण्यात आला. अतिथी च्या हस्ते उत्कृष्ट सजावट भुजलियॉ पुरस्कार प्रथम सौ अर्चना काठोके, व्दितीय किशोरी काठोके, तृतीय पिंकी बरबटे, चतुर्थ प्रतिक्षा हारोडे, पाचवा क्र. किरण हारोडे, सहावा क्र. आरती बरबटे यांना नगदी पुरस्कार देऊन प्रोत्साहनपर सौ अमिता खंडाईत, अनुपमा खंडाईत, प्रिती गडे, कल्पना गडे, कल्पना हारोडे, सुजाता नन्होरे, रीना बादुले, ममता बरबटे, वंदना गडे, आशा मोहणे, सुचित्रा दारोडे, इंद्रकला खंडाईत, किर्ती झाडे, गिता गडे, मंजु गडे, स्नेहा मोहणे, लता कारोंडे, प्रमिला गडे, स्वाती दारोडे, लिना हारोडे, अनिता मोहणे, प्रमिला अक्षम, मंगला चव्हाण यांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नथ्थुजी नन्होरे यांनी तर आभार राजेंद्र खंडाईत हयानी व्यकत केले. कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होऊन मोलाचे सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.