Published On : Fri, Aug 23rd, 2019

रामटेक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा विकास कामाला गती

रामटेक : रोजी रामटेक अंबाळा व नारायण टेकडी येथेआमदार डि. मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब, विधानसभा क्षेत्र यांचे शुभहस्ते विविध योजनानिहाय विविध विकास कामांचे भूमीपुजन संपन्न झाले. त्यामध्ये विविध योजनानिहाय कामांचे समावेश असल्याचे आमदार रेड्डी यांनी सांगीतले .‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम 2019-20 अंतर्गत अठराभुजा देवस्थान, रामटेक येथे रू. 15 लक्ष निधीचे भक्तनिवास बांधकाम व परिसर विकास काम,. जिल्हा वार्षिक योजना 2019-20 नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत नगर परिषद, रामटेक च्या हद्दीत रू. 19.97 लक्ष निधीचे चैपाटीचे बांधकाम आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 अंतर्गत श्री. लंबे हनुमान मंदीर परिसरात रू. 10 लक्ष निधीचे परिसर विकास काम. जिल्हा खनिज प्रतिष्ठान 2018-19 अंतर्गत रामटेक येथे निधीचे श्री. मधुकर किंमतकर यांचे शेतापासून ते श्री. देशमुख यांचे शेतापर्यंत रू. 21.53 लक्ष निधीचे पांधन रस्ता बांधकाम व योगीराज हाॅस्पीटल ते श्री तुरक यांचे शेतापर्यंत रू. 21.98 लक्ष निधीचे पांधन रस्ता बांधकाम अंबाळा येथे जिल्हा वार्षिक योजना 2019-20 (पर्यटन विकास) अंतर्गत रू. 50 लक्ष निधीचे यात्री सुविधा केंद्राचे बांधकाम, नारायण टेकडी, रामटेक येथे जिल्हा वार्षिक योजना 2019-20 नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत रू. 40.47 लक्ष निधीचे जनसुविधा केंद्राचे बांधकाम, नारायण टेकडी, रामटेक येथे ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम 2019-20 अंतर्गत रू. 10 लक्ष निधीचे यात्री निवास बांधकाम व रू. 15 लक्ष निधीचे भक्तनिवास व स्वच्छता गृह बांधकाम आदी करोडो रुपयाच्या निधीतून आमदार मल्लिकार्जुन रेड्डी विकास कामाचा सपाटा सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे .भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्ष दिलीप देशमुख , नगर परिषद उपाध्यक्षा शिल्पा रणदिवे , नगरसेवक प्रभाकर खेडकर ,रामानंद अडामे , प्रवीण मानकर ,संजय बीसमोगरे ,नगरसेविका कविता मूलमुले ,लता कामडे , चित्रा धूरई , वनमाला चौरागडे , क्रूशी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल कोल्हे , किसान नेता नरेन्द्र बंधाटे, , नगर परिषद सदस्य , पदाधिकारी , नागरिक व अधिकारीगण उपस्थित होते .