Published On : Sat, Jan 18th, 2020

महिला उद्योजिका मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन

Advertisement

१९ ते २६ जानेवारीदरम्यान रेशीमबाग होणार महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री : मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने १९ ते २६ जानेवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्या आयोजित असलेल्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. १७) संस्कार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कांचनताई नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका स्वाती आखतकर, विरंका भिवगडे, मंगला खेकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, वंदना भगत, कल्पना कुंभलकर, शीतल कामडी, उषा पॅलेट, स्नेहल बिहारे, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, उपअभियंता हेडाऊ, नागेश सोनकुसरे, श्री. मानकर, पडोळे, ज्योत्स्ना देशमुख, नीता गोतमारे, नूतन मोरे, विकास बागडे, प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, शेखर पातोडे उपस्थित होते.

महिला उद्योजिका मेळावा हा विदर्भातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात येणारा सर्वात मोठा मेळावा आहे. नागपूर महानगरपालिकेने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी टाकलेले हे पाऊल प्रशंसनीय असून महिला बचत गटांच्या महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्याचा यातून प्रयत्न होतो आहे, असे प्रतिपादन श्रीमती कांचनताई गडकरी यांनी केले.

यंदा आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात येणाऱ्या नागरिकांसाठी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी असून दररोज सायंकाळी ६ वाजता त्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दररोज विविध क्षेत्रातील पाच महिलांचा सत्कार मेळाव्याच्या व्यासपीठावर करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी यावेळी दिली.

महिलांच्या उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ मिळण्याकरिता आयोजित मेळाव्याला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement