Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 20th, 2019

  दक्षिण-पश्चिम मतदारसंघात 157 कोटींच्या विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

  नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज विविध प्रभागांमध्ये 157 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून हे कामे होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी दक्षिण पश्चिमचे पालकम राजीव हडप, दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रमेश भंडारी, महामंत्री आशिष पाठक, श्रीपाद बोरीकर, संदीप गवई, अविनाश ठाकरे, सचिन कारलकर, सुरेंद्र पांडे उपस्थित होते.

  प्रभाग 17 मध्ये सायंकाळी शिवलिंग मंदिर जवळ बारासिंगल रोड पटेल टिंबर मार्केट येथे 6.26 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक गोपाल चुटेले, अध्यक्ष, महामंत्री, महिला आघाडी अध्यक्ष, महामंत्री युवा मोर्चा, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  तसेच सायंकाळी रेंघे लेआऊट मोहोड यांच्या घराजवळ, नेताजी कॉलनी, भांगे विहार येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संपर्क प्रमुख गजानन निशितकर, प्रभाग 36 चे नगरसेवक प्रकाश भोयर, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे, स्नेहलता गोतमारे, नगरसेविका अ‍ॅड. मीनाक्षी नितीन तेलगोटे, प्रभाग अध्यक्ष शंकरराव भुते, नारायण आहुजा, संजय देशमुख, निलेश राऊत, मनोज पारसवाणी, गिरीश श्रीरामे, जितेंद्र टिचकुले, किशोर धर्मे उपस्थित होते.

  प्रभाग 13 मध्ये हिंदुस्थान कॉलनी अमरावती येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी वर्षा ठाकरे, परिणिता फुके, अमर हरिश बागडे रुतिका मसराम उपस्थित होते. प्रभाग 37 ब मध्ये गायत्री शाळेजवळ जनसामान्यांच्या सुविधांसाठी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कामांमध्ये रस्ते डांबरीकर, रुंदीकरण, सीसी फ्लोरिंग, आयब्लॉक, चेंबर या कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला नगरसेविका सोनाली कडू, प्रभागाचे अध्यक्ष, महामंत्री, बुथ प्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख, पाधिकारी व कार्यक्रर्ते उपस्थित होते.

  तसेच महात्मा फुले स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या बाजूला गंगाधर अपार्टमेंट स्वावलंबीनगर येथे नगरसेवक प्रमोद तभाने यांच्या प्रयत्नांने 8 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले. यावेळी नगरसेवक प्रमोद तभाने, दिलीप दिवे, संजय उगले, विवेक तरासेशंतनु येरपुडे, परेश जोशी, नितीन महाजन, रेणुका काशीकर, प्रदीप चौधरी, रवी कुळकर्णी, तुषार ठावरे नंदू मानकर उपस्थित होते.

  या 157 कोटींच्या कामांमध्ये प्रभाग 17, 33, 34, 35, 16, 36, 37, 38 व प्रभाग 13 मधील विविध विकास कामांचा समावेश आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145