Published On : Thu, Apr 5th, 2018

भोले पेट्रोलपंप चोरीतील आरोपीला अटक, १,९०,२३५ रुपये रोख जप्त

Advertisement


नागपूर: भोले पेट्रोलपंप चोरी प्रकरणी एकाला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १,९०,२३५ रूपये रोख आणि कायनेटिक गाडी जप्त करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार भोले पेट्रोलपंपचे मालक सचिन प्रभुलाल चिंचानी (५८) दिवसभराच्या विक्रीचे २,१५,२३५ रुपये रोख सोबत घेऊन गिरीपेठ कॉलोनी बिल्डिंग नं. ३ येथील आपल्या घरी जात असताना बाजूला उभ्या असलेल्या इसमाने त्यांना धक्का दिला. त्यांच्या हातातील रोख रकमेची बॅग हिसकावली आणि स्कुटरवर वाट बघत असलेल्या आपल्या साथीदारासह फरार झाला.

घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईल संचावरून तपास केला असता तो हरवल्याची तक्रार चंदनसिंग लोकराम पटेल नामक व्यक्तीने दिल्याचे आढळले. त्याला पोलीस स्थानकात आणून विचारपूस केली असता व त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला असता त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे आढळले. पोलिसी हिसका दाखवताच चंदनसिंगने आपला गुन्हा काबुल केला. कायनेटिक मोपेडने आपण चोरी केल्याचे त्याने कबुल केले. सीताबर्डी पोलिसांनी चंदनसिंगवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement