Published On : Wed, Jan 2nd, 2019

सत्य शोधक संघ कन्हान व्दारे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्य मानवंदना

Advertisement

कन्हान : – डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ऐतिहासिक २०१ शहीदाना भिमा कोरेगाव शौर्य दिवस ०१ जानेवारी २०१९ मंगळवार रोजी मानवंदना देऊन साजरा करण्यात आला. समस्त बहुजन बांधवांनी व आंबेडकरी चळवळीच्या लोकानी भिमा कोरेगाव यांच्या विजय स्तंभला सलामी देऊन मानंवदना देण्यात आली. छत्रपती राजे संभाजी महाराजांचा हत्याचा बदला आणि गुलामगिरीतून स्वताची सुटका करण्याकरिता ५०० महारांनी २८००० (अठ्ठावीस हजार) पेशव्यांना युद्धामध्ये पराजय करित पेशवाई नष्ट केली. त्या विर अस्पृश्य योध्दानी निडरतेने विजय मिळविला . या युध्दामुळे समाजाला एक नवीन दिशा व वर्ण व्यवस्तेतुन स्वातंत्रा चा मार्ग मोकळा करुन दिला. या युद्धात शहीद झालेल्या शूरवीरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्याकरिता यांच दिवशी भीमा कोरेगाव (पुणे ) येथे जायचे .

या शुुरवीरांच्या स्मृतीत ब्रिटिशांनी भव्य दिव्य विजय स्तंभ भिमा कोरेगाव येथे बनविला . डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ऐतिहासिक विजय स्तंभाची प्रतिरुपी उभी करुन भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त विनायक वाघधरे व भगवान नितनवरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली.

१ जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनी मानवंदनेचा कार्यक्रमाचे आयोजन सत्य शोधक संघ कन्हान च्या वतीने अखिलेश मेश्राम, सतीश भसारकर , स्वप्नील वाघधरे , अशोक नारनवरे, गौतम नितनवरे, नितीन मेश्राम, दिपचंद शेंडे, रजनीश मेश्राम, मनिष भिवंगडे, दीपक कुंभारे, निशान्त मोटघरे, पंकज वासनिक, बाबु रंगारी, अजय चव्हान, सागर उके, धिरज नाईक, नरेश चिमणकर, मोंटु राऊत, संदिप शेंडे, मनोज गोंडाने, शुशिल कळमकर आदीने केले .