Published On : Thu, Jan 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नववर्ष -२०२३ भेट : आता घरबसल्या मोबाईल वरून करा पाणी बिला चा भरणा

मनपा-OCW पाणी बिलावर "भीम -यूपीआय क्युआर कोड" ची सुविधा

ऑरेंज सिटी वॉटर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रॉय आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, श्री राहुल कुलकर्णी स्वतः चे पाणी बिल भीम -युपीआय क्युआर कोड वापरून भरले आणि त्याचे उदघाटन केले

नागपूर: नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर तर्फे नागपुरातील सर्व पाणीग्राहकासाठी नवीन वर्षाची (२०२३) ची भेट. आता पाणी ग्राहक, मुख्यत्वे वरिष्ठ नागरिक आणि काम काजी महिला वर्ग ह्यांना घरबसल्या आपल्या मोबाईल वरून सहज ,अगदी सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पाणी बिल भरणे शक्य होणार आहे.

नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी पाणी बिलावर आता डायनॅमिक “भीम -यूपीआय क्युआर कोड” ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे .

आता नागरिकांना झोन कार्यालयात न जाता, रांगेत उभे न राहता कुठल्याही पेमेंट एप (फोन पे , गुगल पे, ऍमेझॉन पे, पेटीएम आणि इतर एप ) तसेच मोबाईल बँकिंग एप वरून ह्या – भीम -युपीआय क्युआर कोड वापरून अगदी घरबसल्या पाण्याचे देयक भरता येईल. क्यूआर कोड द्वारे पाणी बिल भरणा केल्यास , भरणा दिनांकानुसार लागू असलेली तत्पर देयक भरणा सूट किंवा विलंब आकार पुढील देयकात समाविष्ठ करण्यात येईल.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नुकतेच ह्या पाणी बिलावरील प्रकाशित भीम -युपीआय क्युआर कोड चे लोकार्पण ऑरेंज सिटी वॉटर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रॉय आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, श्री राहुल कुलकर्णी ह्यांनी स्वतः चे पाणी बिल भरून केले. ह्याप्रसंगी ऑरेंज सिटी वॉटर चे संचालक श्री केएमपी सिंग, श्री प्रवीण शरण, श्री अमोल पांडे आणि श्री मलोय आणि इतर अधिकारी उपस्थित होते. OCWच्या IT तांत्रिक चमू ने नागपूर भीम युपीआयचा क्युआर कोड ची सुविधा महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर च्या अधिकृत पाणी बिलावर तसेच OCWचे ऑनलाईन पोर्टल www.ocwindia.com आणि नागपूर वॉटर या एप वॉर देखील उपलब्ध करून दिलेले आहे.

या नवीन पर्यायासोबतच नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ची ऑनलाईन सेवा आणि झोन कार्यालयातील ग्राहक सेवा तसेच देयक स्वीकृती केंद्रे ही ग्राहकांना तत्पर सेवा देण्याकरिता उपलब्ध आहे. मात्र सध्याच्या काळात गर्दी आणि इतर त्रास टाळण्यासाठी ग्राहकांनी घरबसल्या ह्या “भीम -यूपीआय क्युआर कोड” तसेच ऑनलाईन पोर्टल @ www.ocwindia.com व नागपूर वॉटर एप ह्या विविध पर्यायांचा वापर करावा असे आवाहन मनपा-OCW ने आपल्या ग्राहकांना केले आहे. या सर्वच सुविधा घरबसल्या मोबाईल हँडसेट्सवरूनसहज व सुरक्षि पद्धतीने वापरून पाणी देयक भरणे शक्य आहे.

इतर कुठल्याही प्रकारच्या माहितीकरिता तसेच तक्रारी करता, नागरिक नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या नि:शुल्क टोल फ्री नंबर 1800-266-9899 वर कधीही संपर्क करू शकतात.

Advertisement
Advertisement