Published On : Sat, Nov 10th, 2018

नागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने

Advertisement

नागपूर : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला.

भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवी शेंडे आणि जिल्हाध्यक्ष नीतेश जंगले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील फलकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनात तन्हा नागपुरी, राजू मेश्राम, भरत लांडगे, आनंद चवर, नालंदा गणवीर, राजेश जंगले, रवि वंजारी, प्रणिता शेंडे, हरीश नारनवरे, नंदिनी सोनी, माया शेंडे, बालू हरकंडे, निर्भय बागड़े, धर्मपाल वंजारी, गौतम पिल्लेवान, भोला शेंडे, विशाल वानखेड़े, गणेश नितनवरे, राजेश चोखाद्रे, भोजराज नंदागवळी, सूरज वानखेडे, अभिजित पडधान, गौतम शेंडे, आनंद बागडे, किशोर खोब्रागड़े, रमेश कांबळे, नरेश गोटेकर, सुमित शेंडे, सुमेध गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.