Published On : Mon, May 3rd, 2021

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण~पश्चिम तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

१ मे २०२१ पासुन १८ वर्षावरिल नागरीकांकरिता लसिकरण सुरू झालेले असुन लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. कोव्हिड महामरीचा सामना करत अस्तांना रक्ताचा तुटवडा लक्ष्यात घेत आज दिं. ०३ मे २०२१ रोजी, भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण~पश्चिम नागपूर युवती विभाग प्रमुख निधीताई तेलगोटे , सहप्रमुख भाग्यश्रीताई अलोणी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

शिबीराचे उद्धाटन भाजपा दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष किशोरजी वानखेडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व तसेच शिबीरात प्रामुख्याने म.न.पा नागपूर स्थायी समिती अध्यक्ष प्रकाशजी भोयर, नगरसेविका मिनाक्षीताई तेलगोटे, नितीनजी तेलगोटे उपस्थित होते.


शिबीरात भाजयुमो दक्षिण-पश्चिम युवामोर्चा अध्यक्ष यशजी सातपूते व युवती विभाग प्रमुख निधीताई तेलगोटे यांनी रक्तदान करून शिबीराचे समारोप केले.यावेळी ज्योत्सनाताई कुऱ्हेकर, राकेशजी भोयर,आशुतोषजी भगत, वेदांतजी जोशी,मनमीतजी पिल्लारे, सौरभजी गणेशकर, मोहितजी भांबूरकर, अक्षयजी आष्टिकर अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.