Published On : Tue, Aug 20th, 2019

“भारत रत्न” राजीव गांधी जयंती प्रित्यर्थ

Advertisement

म.न.पा. केंद्रीय कार्यालयात सद् भावना दिन साजरा

महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली

सद् भावना दिन निमित्त सामूहिक प्रतिज्ञा

भारताचे माजी पंतप्रधान भारत रत्न स्व. राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा.च्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी ‍ समिती सभागृहात नगरीच्या महापौर नंदा जिचकार व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी भारत रत्न राजीव गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली वाहली. तदनंतर महापौरांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद् भावना दिनाची सामूहिक प्रतिज्ञा दिली.

भारत एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे मोठे योगदान असल्याची भावना महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त्‍ केली.

याप्रसंगी विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नगरसेवक मोहम्मद जमाल, अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, अजीज शेख, निगम सचिव हरीश दुबे, सहा. आयुक्त (सा.प्र) महेश धामेचा, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार सहा. संचालक नगर रचना श्री. प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशामक अधिकारी श्री.राजेन्द्र उचके, कार्यकारी अभियंता श्री.गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता श्री. महादेव मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी, निगम अधिक्षक श्री.मदन सुभेदार, आपत्ती व्यवस्थापनचे श्री.सुनिल राऊत, केशव कोठे, दिलीप तांदळे यांच्यासह मोठया संख्येने कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

कार्यक्रमाचे संचालन सहा.जनसंपर्क अधिकारी श्री. प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.‍

विरोधी पक्ष नेता कार्यालयात उपमहापौर व्दारा विनम्र अभिवादन
म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील विरोधी पक्ष नेता कार्यालयातील स्व.राजीव गांधी यांच्या तैलचित्राला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर व विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री. कमलेश चौधरी, हरीश ग्वालवंशी, दिनेश यादव, परसराम मानवटकर, मोहम्मद जमाल, सहा.आयुक्त (सा.प्र.) श्री.महेश धामेचा, निगम सचिव श्री. हरीष दुबे, जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी, म.न.पा.राष्ट्रीय युनियनचे अध्यक्ष श्री. सुरेन्द्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, ईश्वर मेश्राम, शैलेष वरखडे, सुदाम महाजन, इंटकचे महासचिव मनीष पांढरे, किशोर चवरे, दिलीप तांदळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.