Published On : Mon, Dec 6th, 2021

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण ‍दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्री.दयाशंकर तिवारी यांनी संविधान चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

त्यानंतर म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. , उपायुक्त रविन्द्र भेलावे, निगम सचिव रंजना लाडे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, रविन्द्र पागे, राजेश वासनिक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.