Published On : Mon, Apr 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Advertisement

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मनपा मुख्यालयातील इमारतीच्या दालनात भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बी.पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर आयुक्तांनी नागपुरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक श्री. महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी नागपूरकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्यासाठी तयार केलेले संविधान सर्वोत्तम असून आपण सगळ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वजण समानतेने कसे राहू शकतील यासाठी बाबासाहेबांनी कार्य केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.