Published On : Sat, Dec 7th, 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण ‍दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्री.संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी आज (शुक्रवार दि.६ डिसेंबर) रोजी संविधान चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी माजी महसूल मंत्री व भा.ज.पा.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार मोहन मते, माजी आमदार डॉ.मिलींद माने, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, भा.ज.पा.शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके, भा.ज.पा.विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेन्द्र कोठेकर, ज्येष्ठ नगरसेवक व माजी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, संजय बंगाले, विधी समिती सभापती ॲड धर्मपाल मेश्राम, उपनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, झोन सभापती अमर बागडे, माधुरी ठाकरे, लता काडगाये, समिता चकोले, अभिरुची राजगीरे, नगरसेवक संदीप सहारे, प्रमोद तभाने, ॲड निशांत गांधी, विजय चुटेले, राजेन्द्र सोनकुसरे, नगरसेविका संगीता गि-हे, ‍मिनाक्षी तेलगोटे, उज्वला शर्मा, वंदना भुरे, सोनाली कडू, मंगला खेकरे, माजी नगरसेवक प्रा. प्रमोद पेंडके, किशोर गजभिये सहा.आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते.

त्यानंतर म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला महापौर संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे व नगरसेवक किशोर जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्याधिकारी डॉ. सुनील कांबळे, अति.सहा. आरोग्याधिकारी डॉ.विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा. जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, अशोक कोल्हटकर, संजय मेंडुले, राजेश हाथीबेड, राजेश वासनिक, राकेश चाहांदे, राजू मेश्राम, सागर कावलकर, नरेंद्र रामटेके, फुलचंद चंदनखेडे, विनोद डोंगरे, आदी उपस्थित होते.