नामप्रविप्रा’मध्ये आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन

नागपूर: सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या पुढाकाराने नासुप्र आणि नामप्रविप्राच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय (शुक्रवार आणि शनिवार) आरोग्य तपासणी शिबीर (हेल्थ चेकअप कॅम्प) राबविण्यात आले आहे.

Advertisement

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज शुक्रवार, दिनांक ०६ डिसेबंर रोजी स्वत: शिबिरात हेल्थ चेकअप करून याचा लाभ घेतला. बीपी, शुगर, इत्यादी तपासण्या हेल्थ चेकअप कॅम्प अंतर्गत करण्यात येत आहे.

Advertisement

नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार, नासुप्रचे महाव्यवस्थापक व नामप्रविप्राच्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, अधिक्षक अभियंता श्री. पी .पी धनकर, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर आणि आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवधूत तसेच इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कॅम्पचा लाभ घेतला असून उदया शनिवार, दिनांक ०७ डिसेबंर रोजी अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement