Published On : Tue, Jul 9th, 2019

भरदिवसा लूटमारी/वाटमारी करण्याचा प्रयत्न फसला

टाकळघाट,बँक ऑफ इंडिया येथील घटना
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Advertisement

टाकळघाट: स्वतःचा व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याकरिता टाकळघाट येथील बँक ऑफ इंडियातून ६५ हजार रुपये काढून गोंडवाना नगर येथे आपल्या घरी जात असताना एक वृद्ध इसमाच्या हातातील पैसाची रोखड रक्कम घेऊन प्रसार होणाऱ्या आरोपीस दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले.ही घटना आज दि.९ जुलै सकाळी ११ वाजता येथील बस स्थानक चौकात असलेल्या बँक ऑफ इंडिया समोर बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली.

Advertisement

सविस्तर वृत्त असे की ,फिर्यादी हरीचंद गोविंद मोहिते(६५) रा.गोडवना नगर यांचा फर्निचर विक्रीचा व्यवसाय असून ते मोठमोठ्या शहरातून तयार फर्निचर विकत घेऊन गरजू व्यक्तींना विकत असते.सध्या त्यांना फर्निचर चे दोन तीन ऑर्डर मिळाल्या मूळे आपल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी फर्निचर विकत आणण्याकरिता हरीचंद्र मोहिते हे आपली पत्नी पंचफुला मोहिते यांचा सोबत टाकळघाट येथील बँक ऑफ इंडिया मध्ये येऊन ६५ हजार रुपयांची रक्कम काढली.बँक मधून पैसे काढून बाहेर येताच आरोपी शेख आरीफ मो.खलीप (३५) रा.भोईपुरा कामठी व त्याचा साथीदार यांनी हरीचंद यांचा हातात असलेली रक्कम हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडाओरड करताच टाकळघाट येथील ग्रा.प.कर्मचारी व दक्ष नागरिक देविदास मानकर यांनी मोठ्या सतर्कतेने ओरोपी चोराला धरून दबोचले त्यानंतर चौकात बँक समोर उपस्थित असलेल्या नागरिकांनी देविदास याला मदत करून आरोपीला जागीच लोळवले.

Advertisement

महत्वाची बाब अशी की,आरोपी शेख आरिफ मो.खलिफ व त्याचा मित्र हे हरीचंद्र मोहिते यांच्यावर पाळत ठेवूनच होते.जसेही त्यांनी पैसे काढून बँकेच्या बाहेर येताच आरोपींनि पैसे हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला असता.मुख्य आरोपी शेख आरिफ मो.खलीफ याला पकडण्यात यश आले मात्र त्याचा सोबत असलेला दुसरा आरोपी हा प्रसार झाला असून वृत्त लिहिस्तोवर त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.

सम्बधित घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच डी बी स्कॉड प्रमुख पो ह इकबाल शेख हे हेड कॉन्स्टेबल प्रमोद बनसोड,रमेश नागरे व अशोक शेडगे यांना घेऊन घटना स्थळी दाखल झाले.आरोपीला ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला व आरोपी शेख आरिफ मो.खलीप यांचा विरुद्ध भा.द.वि.३९३ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

विशेष म्हणजे बँक ऑफ इंडिया ही टाकळघाट येथील मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी आहे.आणि अशा ठिकाणी लुटमारीचा घटना होणे म्हणजे पोलिसांचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असून यापूर्वी ही १ फेब्रु २०१९ ला खापरी मोरेश्वर येथील विठ्ठल तुकाराम भगत (७२) या वृद्धांचे ३३ हजार रुपये चोरट्यानी येथूनच लंपास करून पळ घातला होता.परंतु त्या घटनेतील आरोपी शोधण्यास एमआयडीसी पोलिसांना अजूनही यश आले नसल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खिशात पैसे घेऊन फिरणे म्हणजे स्वतःला जिवाला दावणीला बांधण्याचा प्रकार असून सर्वांनी ऑनलाईन किंवा डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याकडे भर द्यावा.असे आव्हान बँकेचे बँक मित्र प्रा.विलास डायरे यांनी केले.जेणेकरून यासारख्या लुटमारीच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

– संदीप बलविर, टाकळघाट, नागपूर टुडे

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement