
नागपूर -नागपूरच्या भांडेवाडी परिसरात १५ जून रोजी झालेल्या रक्तरंजित गँगवॉरनंतर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. एका गुन्हेगार टोळीवर मकोका लागू करण्यात आला असून, दुसऱ्या टोळीवरही मकोका लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, फरार झालेला दुसऱ्या टोळीचा म्होरक्या यश प्रधान याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
१५ जूनच्या रात्री भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतुजी नगर परिसरात जुन्या वैमनस्यातून दोन टोळ्या आमनेसामने आल्या. वादाचे रूपांतर काही क्षणांतच भीषण गँगवॉरमध्ये झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर कोयते आणि चाकूंनी हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या हिंसक घटनेदरम्यान एका दुचाकीलाही आग लावण्यात आली. घटनेनंतर भांडेवाडी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करून अनेक आरोपींना अटक केली. तपासादरम्यान दोन्ही टोळ्या संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. तर दुसऱ्या टोळीवरही मकोका लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मकोकाची कारवाई सुरू होताच दुसऱ्या गटाचा म्होरक्या यश प्रधान फरार झाला होता.
तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम राबवत पोलिसांनी अखेर यश प्रधानला अटक केली. सध्या त्याच्याकडे चौकशी सुरू असून, टोळीतील इतर सदस्य, त्यांचे गुन्हेगारी जाळे आणि पूर्वीचे गुन्हे याबाबत माहिती घेतली जात आहे. संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
"तड़ीपार बदमाश की शहर में वापसी ; नागपुर में तड़ीपार बदमाश का...
ऑनलाइन लाइफ पार्टनर प्लेटफॉर्म से हुई थी दोनों की पहचान #nagpurnews #crimenews...
पीड़िता की शिकायत पर शांतिनगर थाने में केस दर्ज #nagpurnews #nagpur #crimenews...
मोबाइल से वीडियो बनाने के शक में खूनी हमला #nagpurnews #crimenews #news...
सावनेर के बोरुजवाड़ा में युवक ने फांसी लगाकर की आत्महत्या #nagpurnews #nagpur...
भिवंडी हादसे पर मंत्री गिरीश महाजन मौके पर #maharashtranews #bhiwandi #newsupdate #maharashtra




