Published On : Fri, Jul 31st, 2015

भंडारा (पवनी) : वन विभागा तर्फे व्याघ्र दिन


Vyaghra Diwas  (1)
पवनी (भंडारा)।
जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी सर्वत्र साजरा केला जातो त्या निमित्याने उमरेड- कऱ्हाडला वन्यजीव अभयारण्य वन्यजीव कार्यालय पवनी तर्फे शालेय विद्यार्थ्यां करीता चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. जंगल- नदीची माता व माझा आवडता प्राणी या विषयावर आधारित ह्या स्पर्धामध्ये वैनगंगा व पवन विद्यालय पवनी चे विद्यार्थी सहभागी झाले, वैनगंगा विद्यालयाच्या अंकिता वैरागडे , वैभवी भिवनकर , कुकडे , सोनाली राउत , तर पवन विद्यालयाच्या मनीषा बागडे ,जयश्री कुर्झेकर, मयुरी तिघरे, शरयू बोरकर, मोहिनी नागपूरकर, मृणाल नागलवाडे , मयुरी सावरबांधे, हर्ष सुखदेवे इत्यादी विद्यार्थ्याना नवेगाव- उमरेड येथील वन विभागाच्या विश्राम गृहात आयोजित एका कार्यक्रमात स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Vyaghra Diwas  (2)
वन्यप्राण्यांचा अधिवास व जंगलातील विविध वनस्पती, पक्षी इत्यादींची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांकरीता जंगल भ्रमंती चे आयोजन करण्यात आले ह्या प्रसंगी पवनी वन्यजीव प्रकल्पाचे अधिकारी व्ही. जे. गायकवाड यांनी विद्यार्थ्याना व शिक्षकांना वनक्षेत्रात प्राणी व पक्ष्यांकारीता केलेया उपाय योजनांची माहिती दिली. वन कर्मचारी व वनपाल यांनी बांधलेल्या बांबूच्या मचाणी,सौर उर्जेवर आधारित उपकरणाद्वारे वन्य प्राण्याकरीता केलेली पाण्याची सोय, वनकुटी, विविध तलाव, व जलसाठे इत्यादी बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली . जंगल भ्रमंती दरम्यान हरीण, काळवीट, नीलगाय, बायसन , मोर, लांडोर इत्यादी प्राणी व पक्षी विद्यार्थ्यांनी पाहिले. ज्या जंगलात वारुळ संख्या जास्त ते जंगल समृद्ध ह्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना भ्रमंती दरम्यान आला.

Vyaghra Diwas  (3)

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement