Published On : Sat, Jul 18th, 2015

भंडारा (पवनी) : रेती वाहतूक प्रकरण : पाच लाख दंड वसुल


अतिभार क्षमतेने रेती वाहतूक
दिवसरात्र रेतीचा उपसा

Sand Trucks
सावांददाता / चंद्रशेखर कठाने

Advertisement

पवनी (भंडारा)। तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटावरून अधिकृतरीत्या रेती उपसा करण्यासाठी घाटांचे रीतसर लिलाव झालेले आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी नामांकीन लोकांनी रेतीघाटाकळे लक्ष केंद्रित केलेले आहे. नियमाप्रमाणे रेतीचा उपसा करून वाहतूक करुण झटपट श्रीमंती पदरात पडत नाही, त्यामुळे रेतीमाफियांनी दुसरा उपाय शेधून काढला. संबंधित अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असेल तर सहजरित्या चोरी करता येते। असा फार्मुला वापरून दिवसरात्र रेतीचा उपसा करून चोरी होऊ लागली आहे.

Advertisement

वर्तमानपत्रात बातम्या लागल्या की एखादी कार्यवाही करायची व पुन्हा स्वस्थ बसायचे, असे धोरण जिल्ह्यापासून तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी ठरवून ठेवलेले आहे आणि त्यानुसार कार्यवाही सुरु असते. अशीच एक कार्यवाही महसुल विभाग द्वारा 13 जुलै रोजी मिलज फाट्यावर करण्यात आली. या कार्यवाहित रेती चा ओवरलोड ट्रक अडविण्यात आलेला होता.

Advertisement

महसुल विभागाद्वारे अडविण्यात आलेल्या 33 ट्रक मालकांकडून 6 लाख 20 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यासाठी प्रशासन ने पाऊले उचलली आहे. तहसीलदार नरेंद्र राचेल्वार ने 5 लाख 18 हजार 200 रुपये दंड 15 जुलै पर्यंत वसूल केला. आतापर्यंत दंडाची रक्कम वसूल करून ट्रक सोडले जात होते. परंतु पहिल्यांदाच 33 ट्रक सह रेती जप्त करण्यात आली आहे. सर्व ट्रक पवणीच्या बस आवारात उभे करण्यात आले. प्रती ट्रक 300 रुपये जागेचा पार्किंग भाडा ट्रक मालकाकडून दर दिवसात वसूल केला जात आहे.

Sand Trucks (2)
13 जून 2015 चे महसूल व वन विभागाच्या अध्वादेशाचा आधार घेऊन ट्रक मालकावर ट्रक जप्तीची कार्यवाही करण्यात येत असल्याचे तहसीलदार राचेल्वारांनी संगितले. 13-16 जुलै दरम्यान ट्रक मालकांचे ट्रक कामाशिवाय उभे ठेवण्यात आलेले आहेत.

वाहतुकीचा रोजगार करणारा ट्रक मालकांवर शासनाकडून दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. रेती घाटावरून क्षमते पेक्षा जास्त रेती भरून दिल्या जात नाही. परंतु झटपट श्रीमंत होण्यासाठी एवढा आटापिटा करणाऱ्या घाट लिलावात घेण्याचा व्यवसायीकांवर कार्यवाही करण्यास प्रशासन मागेपुढे पाहत आहे.

रेतीची चोरी असो की क्षमते पेक्षा जास्त वाहतूक याचे मूळे उगमस्थान रेतीघाट असल्याने त्यावर प्रथम कार्यवाही व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. तर जप्त केलेले ट्रक सुरक्षित राहावे यासाठी तहसीलदार नरेंद्र राचेल्वार व त्यांचे कर्मचारी, पोलीस निरिक्षक मधुकर गीते व पोलीस कर्मचारी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुर्नवेळ लक्ष ठेऊन आहेत.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement