Published On : Mon, Jan 17th, 2022

भंडारा मतदानासाठी यंत्रणा सज्ज

Advertisement

13 जिल्हा परिषद गट व 25 पंचायत समिती गणाकरीता होणार मतदान
·3 लाख 67 हजार मतदार बजावणार हक्क
· मतदानासाठी 5072 अधिकारी-कर्मचारी नियुक्त
·साहित्यासह मतदान पथके रवाना

भंडारा : जिल्ह्यात 13 जिल्हा परिषद गट व 25 पंचायत समिती गणाकरीता उद्या मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी 3 लाख 67 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Advertisement

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानात 21 डिसेंबर रोजी 70.33 टक्के मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार अनारक्षीत जागासाठी उद्या मतदान होणार असून 19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 601 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात 1 लाख 85 हजार 715 पुरूष व 1 लाख 81 हजार 793 स्त्री मतदार उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील.

सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने मतदानासाठी सुट्टीचे व अन्य खासगी आस्थापनांनी मतदानासाठी दोन तास सवलत देण्याबाबतही निर्देश दिले आहेत. तसेच मतदान क्षेत्रात मद्यविक्रीला प्रतिबंध आहे. मतमोजणीच्या पार्श्वभुमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून संबंधित परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता आज पोलींग पार्टींना साहित्य वाटप करतांना सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदीचे कटाक्षाने पालन करण्यात आले.

मतदानासाठी 5072 अधिकारी – कर्मचारी नियुक्त

मतदान केंद्राध्यक्ष 691, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष 691, मतदान अधिकारी क्रमांक एक – 691, मतदान अधिकारी क्रमांक दोन- 689, शिपाई -601, पोलीस शिपाई 657, बीएलओ 570 आरोग्य कर्मचारी/आशा वर्कर 582 या प्रकारे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement