Published On : Mon, May 28th, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 42 टक्के मतदान

Advertisement

voting
भंडारा-गोंदिया: निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झालं. पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल.

या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आल्या होत्या.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार होती, तर नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्यात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

एकूण दोन हजार 126 मतदान केंद्र होते, तर मतदारांची संख्या 17 लाख 48 हजार 677 एवढी होती. यापैकी 42 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.