Published On : Wed, May 30th, 2018

फेरमतदानातही ईव्हीएमचा घोळ कायम?

Advertisement

गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर निवडणूक आयोगाने ४९ बुथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच घोळ कायम असल्याच्या बातम्या समोर येत आहे.

गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बटण दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान होत असल्याचे दिसून आले आहे. २३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार घडला आहे. सोबतच कामठा येथील ११७ क्रमांकाच्या बुथवर सुध्दा व्हीव्हीपीटी काम करीत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सोमवारी संपन्न झालेल्या मतदानावेळी ईव्हीएम मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मतदानासाठी आज येथे शासकीय सुटीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच घोळ कायम असल्याच्या बातम्या समोर येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.