भंडारा। काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांमध्ये लढत झाली असून 67 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.मतदानानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी पलाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी त्रिस्तरीय रचना असून यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या पहिल्या स्तरात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 29 जवान कर्तव्यावर आहेत. तर राज्य राखीव पोलीस दलाचे 25 तर जिल्हा अधीक्षक कार्यालयातील 22 अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आज उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या व निवडणूक निरीक्षक विनय सिंग यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूमचे सिलिंग करण्यात आले .तसेच निवडणूक कागदपत्रांची ECI च्या निकषानुसार उमेदवार /प्रतिनिधी यांचे समक्ष छाननी करण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे उमेदवार/प्रतिनिधी,योगेश कुंभेजकर, निवडणूक निर्णय अधिकारी ,प्रजीत नायर ,जिल्हा निवडणुक अधिकारी गोंदिया ,आशा पठाण, अप्पर जिल्हाधिकारी भंडारा, दोन्ही जिल्ह्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा/गोंदिया इ.प्रामुख्याने उपस्थित होते.
रवि आर्य