Published On : Sun, Oct 18th, 2020

भंडारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पोहचला 82.44 टक्क्यांवर

Advertisement

भंडारा : जिल्ह्यात आज 228 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6080 झाली असून आज 79 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7375 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.44 टक्के आहे.

आज 936 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 79 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 59 हजार 147 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7375 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 18, मोहाडी 05, तुमसर 13, पवनी 19, लाखनी 07, साकोली 04 व लाखांदुर तालुक्यातील 13 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 6080 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 7375 झाली असून 1108 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 187 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.44 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.53 टक्के एवढा आहे.

नागरीकांना आवाहन

· कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

· साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

· साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.