Published On : Sat, Jan 25th, 2020

Video : भरदिवसा वाघाचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन जण गंभीर

Advertisement

भंडारा: सिहोरा परिसरातील महालगाव फाट्यावर वाघाच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतले आहेत. हे तीन जण मोटारसायकलवरून जात असताना वाघाने त्यांच्यावर झडप घातली. तुमसर तालुक्यातील बिनाखी शिवारात सकाळी ११ वाजता ही घटना घडली.

शंकर तुरकर (६७) मु. पंढरवानी (मध्यप्रदेश), छोटेलाल ठाकरे (३५) मु. गोंदेखरी व वीरेंद्र सहारे (४५) मु.सिंदपुरी यांना वाघाने गंभीर जखमी केले आहे. जखमींना सिहोरा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून भंडारा येथे हलविण्यात आले आहे. यापूर्वी गोंदेखरी येथीलच गणेश बनकर यांचा त्याच वाघाने जखमी केले होते.

Advertisement
Advertisement

या हल्ल्याचा थरार व्हिडिओतही कैद झाला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement