Published On : Thu, Jul 23rd, 2020

भाजयुमोने मनपाला वितरीत केले मास्क आणि पीपीई कीट

नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी भाजयुमोने पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम नागपूरच्या वतीने गुरुवारी (ता. २३) मनपाला मास्क, हातमोजे आणि पीपीई कीट देण्यात आल्या.

भाजयुमोचे पश्चिम नागपूर महामंत्री पुष्कर पोशेट्टीवार यांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे ह्या वस्तू सुपूर्द केल्या. यावेळी भाजयुमोच्या महानगर अध्यक्ष शिवाणी दाणी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, भाजयुमो पश्चिम नागपूरचे उपाध्यक्ष अक्षय शर्मा, स्वप्नील खडगी उपस्थित होते.

महापौर संदीप जोशी म्हणाले, कोव्हिड-१९ विरुद्धचा लढा हा सर्वांनी एकत्रित येऊन लढायचा आहे. समाजातील प्रत्येक घटक यासाठी हातभार लावत आहे. भाजयुमोने मनपा आरोग्य विभागातील कर्मचारी करीत असलेल्या कामाची दखल घेऊन दिलेल्या वस्तू ह्या लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, असे म्हणत त्यांनी भाजयुमो पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.