Published On : Wed, May 13th, 2020

भद्रावती तालुक्यात उपविभागीय अधिकारी शिंदे यांची रेती साठय़ावर मोठी कारवाई

Advertisement

– १५०० ब्रास पेक्षा जास्त रेती साठा केला जप्त, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करणार उपविभागीय सुभाष शिंदे यांची माहीती.

वरोरा :- भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिंपरी. चारगाव, कुणाडा या रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून तो रेती साठा वेकोली चारगाव चौकी परिसरात व इतरत्र पिंपरी जंगल परिसर, गाव शिवारात आणि तेलवासा, कुणाडा वेकोली परिसरात भद्रावती येथील काही रेती माफियांनी लपवून ठेवला होता.

या प्रकरणात भद्रावती तहसीलदार शितोळे यांच्याच आशीर्वादाने रेती तस्करी होतं असल्याची टीका प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी या रेती चोरी प्रकरणाची दखल घेवून स्वतः चौकशी केली व उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मदतीने व तहसीलदार शितोळे यांना घेऊन या परिसरातील संपूर्ण रेती साठा काल दिनांक १२ मे ला सकाळी ७.०० वाजेपासून ११.०० वाजेपर्यंत शोधून काढला.

या संदर्भात त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहीती नुसार पकडलेला हा रेती साठा नेमका कुणाचा आहे याचा शोध घेवून संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करू व या रेती चोरी मधे जे गुंतले असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून हया रेती साठ्याचा लिलाव करून तालुक्यातील विविध बांधकाम करणाऱ्याना शासन दरामध्ये उपलब्ध करून देवू असे म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची भद्रावती परिसरातील ही कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून जवळपास १५०० ब्रास रेतीचा साठा जप्त केल्याने या रेती साठय़ायापासून शासनाला लाखो रुपयाचा महसूल मिळणार आहे. त्यांच्या या कारवाई ने वरोरा भद्रावती तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.