Published On : Mon, Feb 22nd, 2021

खबरदार….विना मास्क बाहेर पडाल तर…!-तहसीलदार हिंगे

संदीप कांबळे कामठी

कामठी :-कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज असला तरी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. मात्र बहुधा नागरिक हे अजूनही वीना मास्क ने फिरताना दिसताहेत , विनाकारण स्वतःची व स्वकुटुंबाची कुठलीही पर्वा न करता बेजबाबदार पणाने वागताना दिसताहेत तेव्हा नागरिकानो प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर करावा व कोरोनाचा संक्रमण टाळावा

यासाठी कामठी तालुका प्रशासनिक अधोकारो खुद्द रस्त्यावर उतरून विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाही करून तंबी देत आहेत तसेच तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील मंगल कार्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस यांना प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करित आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठो तहसीलदार अरविंद हिंगे व बिडीओ अंशुजा गराटे, पोलीस निरीक्षक संजय मेंढे सह अधिकारो प्रत्यक्ष भेट देत आहेत.

याप्रसंगी विनामास्क दिसणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा सूचना सुद्धा दिल्या आहेत .याप्रसंगी मागील दोन दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 50 च्या वर नागरिकांवर दंडात्मक कारवाहो करण्यात आली तेव्हा खबरदार…विना मास्क फिराल तर….असा इशारा सुदधा तहसोलदार अरविंद हिंगे यांनी दिला आहे.