Published On : Tue, Apr 30th, 2019

कन्हान शहरात चारपदरी सिमेंट रस्ता दुभाजक कधी बनणार ?

मधोमध खोलगट व गिट्टीमुळे दिवसेंदिवस अपघात वाढले

Advertisement

कन्हान: ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण काम मंद गतीने, अनियमित, निकृष्ट, निष्काळजीपणाने होत असल्याने तसेच कन्हान शहरात रस्ता दुभाजक न बनविल्याने वाहन चालकांना अपघाताचा सामना करून कुणाला शारीरिक अपंगत्व तर कुणाला प्राण गमवावे लागत आहे.

Advertisement

ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट महामा र्गाचे १८ कि मी लांबीच्या निर्माण कामा चा २५३ कोटी रु. खर्चाच्या लागत ने केसीसी कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कंपनी छोटय़ा छोटय़ा काही लोकांना थोडे थोडे बांधकाम (पेटी कॉन्टयाक) दिलेले आहे. तरी सुध्दा बांधकाम मंदगतीने सुरू असुन व्यवस्थित करण्यात येत नाही.आणि संबंधित अधिकारी ढुंकून सुध्दा पाहत नसल्याने कामाचा दर्जा घसरल्याने अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Advertisement

कन्हान शहरात चारपदरी सिमेंट रस्त्याच्या मधोमध मेट्रो रेल्वे करिता रिकामी १० फिट जागा सोडण्यात आली आहे. यात कुठे कुठे खोलगट तर कुठे कुठे गिट्टी भरण्यात आली आहे. टेकाडी बसस्टाप पासुन ते पोटभरे भवन संताजी नगर पर्यंत तीन फिट उंच रस्ता दुभाजक भिंत बनविण्यात आली आहे. परंतु संताजी नगर ते पोलीस स्टेशन कन्हान पर्यंत अाता पर्यंत रस्ता दुभाजक बनविण्यात न आल्याने खोलगट भागात दुचाकी, चारचाकी वाहने उतरून किंवा गिट्टी वरून वाहने घसरून पडल्याने दररोज पाच सहा अपघात होऊन वाहन चालक व मागे स्वार व्यक्तीना दुखापत होउन शारिरीक अपंगत्वाचा सामना करावा लागत आहे. हा खोलगट भाग काही वाहन चालक पार्किंग म्हणुन मोठय़ा प्रमाणात उपयोग करतांना दिसत आहे. यामुळे सुध्दा सामोरील वाहन न दिसल्याने अपघात होत आहे. चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कंपनी एखाद्या मोठय़ा अपघाताची वाट बघत आहे का ? असा प्रश्न नागरिक करीत आहे. रस्ता निर्माण कामामुळे कन्हान पोलीस स्टेशनची वाहतुक व्यवस्था सुध्दा वा-या वर सोडल्याचे चित्र दिसत आहे. यास्तव कन्हान शहरात तातडीने चारपदरी सिमेंट रस्ता दुभाजक बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement