Published On : Fri, Oct 25th, 2019

पालकमंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन

नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 49 हजारांपेक्षा अधिक मतांनी झालेल्या विजयाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर अभिनंदन केले. या विजयानंतर प्रथमच मुख्यमंत्री नागपुरात आले होते.

यावेळी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित झाले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांचेही एकाच मोठ्या पुष्पहाराने स्वागत करून जल्लोष केला.

Advertisement

खा. विकास महात्मे, प्रा. राजीव हडप संदीप जोशी, अजय संचेती, माजी आ. मिलिंद माने, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. उपेंद्र कोठेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement