Published On : Mon, Oct 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्याच्या जीवावर बेतल्यास बँकांना सोडणार नाही; कर्जवसुलीच्या तगाद्यावर बावनकुळेंचा इशारा

Advertisement

Auto Draft

नागपूर -दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बँका, पतसंस्था, खासगी वित्तसंस्था किंवा फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी फोन करून दबाव आणू नये. या तगाद्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने जीव संपवल्यास संबंधित बँक, पतसंस्था आणि प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे नियोजन सुरू असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दुष्काळातील नुकसानीचे पंचनामे अचूकपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी पीक काढून घेतले असले तरी त्यांच्या शेताचे पंचनामे केले जाणार आहेत. ड्रोन सर्व्हे, गुगल इमेज आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे.

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी बँकांविरोधातही सरकारने भूमिका कठोर केली आहे. अशा बँकांमधील शासकीय खाती काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.