Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राजस्थानात चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावात; दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

दहा महापालिकांच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, ओम बिर्ला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी समन्वय | महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या टीमसोबत विजयी रणनीतीवर भर
Advertisement

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचा अनुभव आता राजस्थानमध्ये वापरण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बावनकुळे यांची राजस्थान महापालिका निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून बावनकुळे राजस्थानमध्ये सक्रिय असून त्यांनी जयपूर, कोटा, भरतपूर, जोधपूर, उदयपूर, अजमेर, पाली, बिकानेर, भिलवाडा आणि अलवर या दहा प्रमुख महापालिकांचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी निवडणूक व्यवस्थापन, संघटनात्मक बांधणी आणि प्रचार यंत्रणेचा आढावा घेत भाजपच्या विजयासाठी रणनीती आखली.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या संपूर्ण दौऱ्यात बावनकुळे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री तसेच राजस्थानमधील वरिष्ठ भाजपा नेत्यांशी नियमित समन्वय साधला आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

Advertisement

राजस्थानमध्ये स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचीही बावनकुळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. यासोबतच विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख, राजकीय विश्लेषक, व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख, पत्रकार आणि युवा समूहांशी चर्चा करून स्थानिक प्रश्न जाणून घेतले.

जनतेकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना प्रचार आणि संघटनात्मक कामकाजाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

कोअर कमिटी बैठका आणि संघटनात्मक रणनीतीवर भर

बावनकुळे यांच्या राजस्थान दौऱ्यात कोअर कमिटी बैठका, प्रचारसभा आणि धार्मिक स्थळांना भेटी यावरही भर देण्यात आला. बिकानेर येथे झालेल्या बैठकीला केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह उपस्थित होते.

जयपूरमध्ये संघटनात्मक बैठक तसेच प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापनाचा पॅटर्न मांडला.

या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड, प्रदेश प्रभारी राधामोहनदास, राष्ट्रीय महामंत्री हरीश द्विवेदी, राष्ट्रीय महामंत्री गजेंद्रसिंह पटेल, राष्ट्रीय मंत्री संगीता यादव, राष्ट्रीय मंत्री रोहन गुप्ता आणि दिल्ली सरकारमधील मंत्री रवींद्र इंद्राज सिंह उपस्थित होते.

कोटा आणि उदयपूरमध्ये प्रचाराला वेग

कोटा येथे बावनकुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली तसेच प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह ठाणे भाजपा अध्यक्ष संदीप लेले, देवांग दवे, अमित चव्हाण, रवींद्र साळेगावकर, अमित जाधव, अक्षय फाटक आणि राजेंद्र शिळीमकर उपस्थित होते.

उदयपूर येथे बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीतील भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक घेतली. प्रचारयंत्रणा, स्थानिक मुद्दे आणि निवडणूक रणनीतीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी माजी खासदार मनोज कोटक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील टीमसोबत राजस्थानमध्ये रणनीती

राजस्थानमधील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांची टीमही बावनकुळे यांच्या रणनीतीत सहभागी झाली आहे. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधत बूथ पातळीपासून प्रचार यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

राजस्थानमध्ये स्थायिक असलेल्या मराठी बांधवांसोबतच्या संवादातून स्थानिक प्रश्न आणि मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक पातळीवर प्रचाराची दिशा निश्चित केली जात आहे.

बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही मोर्चेबांधणी राजस्थानमधील दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.