Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीला धारणीत सार्वजनिक वाचनालयासाठी जागा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

विद्यार्थी आणि वाचकांना मिळणार आधुनिक सुविधा
Advertisement

मुंबई,: अमरावती जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र असलेल्या धारणी येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालय उभारण्यात येणार आहे. यासाठी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला (शाखा धारणी) या संस्थेला शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, महसूल विभागाने मंगळवार ( दि. २१) रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.

या निर्णयानुसार मौजे धारणी येथील शिट क्र. ४, प्लॉट क्र. २१९ मधील १६३ चौ. मी. क्षेत्रफळाची शासकीय जागा डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला (शाखा धारणी) या संस्थेला सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने देण्यात येणार आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शासन निर्णयानुसार संबंधित जागेचा वापर केवळ सार्वजनिक वाचनालयासाठीच करता येणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जागेची विक्री, हस्तांतरण, गहाण किंवा भाडेपट्ट्याने देणे शक्य होणार नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक नियोजन प्राधिकरणाच्या सर्व विकास नियंत्रण नियमांचे पालन संस्थेला बंधनकारक राहणार आहे.

याबाबत महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की,शिक्षण, वाचन आणि ज्ञानसंस्कृतीचा प्रसार हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. धारणीसारख्या दुर्गम भागात सार्वजनिक वाचनालयाची उभारणी होणे ही नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच सर्वसामान्य वाचकांना दर्जेदार वाचन सुविधा उपलब्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दुर्गम भागातही शिक्षण आणि ज्ञानाच्या संधी समानपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हा निर्णय त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.