Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘नीट’ आंदोलनावर बावनकुळेंचा हल्लाबोल; हे विद्यार्थ्यांचे नव्हे, सरकारविरोधी राजकारण!

Advertisement

नागपूर : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर राज्याचे मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

बावनकुळे म्हणाले, काही विशिष्ट गटांकडून समाजात असंतोष पसरवण्याचे काम सुरू असून आंदोलनाच्या नावाखाली राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली असून पुन्हा परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांचे राजीनामे मागणे म्हणजे केवळ राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते पुढे म्हणाले, पेपरफुटी करणाऱ्यांना शिक्षा झाली आहे. सरकारने जबाबदारी टाळलेली नाही. परीक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा सुचवणे अपेक्षित असताना काही जण आंदोलनाच्या माध्यमातून द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. काही विद्यार्थी मानसिक तणावामुळे आंदोलनात सहभागी झाले असतील, मात्र त्याचा अर्थ सरकार निष्क्रिय आहे, असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरातील चोरीच्या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले. देशातील विविध मंदिरांमध्ये अशा घटना घडतात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली होती, तेव्हा संबंधितांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली नव्हती, याची आठवण त्यांनी करून दिली. अयोध्येतील घटनेतही आरोपींना अटक करून कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण असूनही त्यांनी उपस्थिती लावली नाही. राजकीय गणितामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करून कोणताही राजकीय लाभ मिळणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.