– प्रसाधनगृहाची सुद्धा गैरसोय बडोदा बँक बेलाचा उपक्रम
बेला : कोरोनाचे चे सावटात येथील बँक ऑफ बडोदा चे ग्राहकांना वाढत्या उन्हाचे काहिली त आर्थिक व्यवहारासाठी तप्त उन्हात उभे रहावे लागत आहे. यावरून शीत वातानुकूल तेत बसणारे अधिकारी’ संवेदनशून्य ‘झाले की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच येथे ग्राहकांकरिता प्रसाधनगृह सुद्धा नाही . त्यामुळे ग्राहक त्रस्त असून महिलांची कुचंबणा होत आहे.
गर्दी होऊ नये ,यासाठी बँक शाखेत ‘ वन बाय वन ‘ सिस्टीमने ग्राहकांना प्रवेश देण्यात येतो. मात्र , या उपक्रमात अनेक स्त्री-पुरुष व वृद्ध निराधार ग्राहकांना सध्याचे क डक उन्हात कामकाजाचे प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. सदर बँकेत लाखोची दैनंदिन उलाढाल होत असते .त्यातून बँकेला मोठा फायदा आहे .तरीपण ग्राहकांची परवड होत आहे ..त्यामुळे कमाल व्यक्त होत आहे.अडीच तीन वर्षापूर्वी ला बँक ग्रामपंचायतीचे जुन्या कार्यालयात स्थानांतरित झाली.सोयीस्कर दुरुस्ती ,बांधकाम करून बँक प्रशस्त अद्ययावत व वातानुकूलित यंत्रणेसह सुसज्ज करण्यात आली .यामध्ये अधिकारी कर्मचार्यांसाठी आत मध्ये सुलभ स्वच्छतागृह व बाथरूम सुद्धा बांधण्यात आले बँकेचे फर्निचर ओलांडून ग्राहकांना आत जाणे अडचणीचे वाटते. व बँकेने तशा व्यवस्थेचा फलक सुद्धा लावला नाही. बाहेर आवारात ग्राहकांसाठी प्रसाधन गृह बांधण्यात आले नाही. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी ग्राहकांना इकडेतिकडे भटकावे लागते.शीत वातानुकूल तेत बसून अधिकारी सेवा देताना मात्र ,ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागत आहे असे विषम चित्र येथे पाहायला मिळत आहे.
नामधारी मुत्रीघर होते ,तेही झाले बंद !
या आवारात ग्रामपंचायत ने एका कोपऱ्यात नामधारी कामचलाऊ मुत्रीघर बांधले होते. त्याजवळ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्यालयास खोली देण्यात आली. त्यामुळे सदर मंडळाने दुर्गंधी येते म्हणून ,तेही मुत्रीघर बंद करून टाकले. त्यामुळे ग्राहकांचे त्रासात भर पडली आहे. समोर एक नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह आहे .मात्र, ग्रामपंचायत च्या वतीने त्याची देखभाल होत नाही.त्यामुळे ते घाणेरडे असते .शिवाय, महिलांचे दार उरफाट्या दिशेचे असल्याने व पुरुषांचे दार ओलांडून महिलांना जावे लागत असल्याने महिला भगिनी तिथे जात नाही. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
प्रतिक्रिया:- मागील वर्षी उन्हाळ्यात बँकेसमोर पेंडॉल टाकण्यात आला होता. तेव्हा माकडांचा हैदोस पाहायला मिळाला. यंदाही पेंडॉल टाकले जाईल. बँकेतील स्वच्छतागृह ग्राहक वापरू शकतात. आवारात बाहेर वेगळे प्रसाधनगृह बांधणे शक्य नाही. तसेच पेंडॉल मध्ये ग्राहकांसाठी खुर्च्या ठेवणे सुद्धा शक्य नाही.
– प्रफुल्ल रामटेके,उपप्रबंधक,बँक ऑफ बडोदा.शाखा बेला