Published On : Fri, Jul 19th, 2019

त्या लूटमारी च्या प्रकरणातील दूसरा आरोपी अटक

Advertisement

– टाकळघाट बैंक ऑफ इंडिया येथील प्रकार,भरदिवसा वृद्धाचे ६५ हजार लुटले,एमआईडीसी पोलिसांना यश

टाकळघाट/१९ जुलै:-फर्नीचर च्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने बँक मधुन पैसे काढलेल्या वृद्ध व्यक्तीचे रोख ६५ हजार त्यांच्या हातातुन हिसकावून चोरटयांनी पळ काढला परंतु दक्ष नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्याला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला.व पोलिसांच्या स्वाधीन केले.ही घटना ९ जुलै रोजी बैंक ऑफ इंडिया बसस्थानक चौक येथे घडली असून त्यावेळी एकास ताब्यात घेतले होते तर दुसरा आरोपी पळून जाण्याचा यशस्वी ठरला होता.मात्र एम आय डी सी पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीमुळे दुसऱ्या आरोपीला पकडन्यात एमआईडीसी पोलिसांना यश आले.आरोपीचे नाव शेख रफीक शेख यूसुफ वय ५० रा. महाल,नागपुर असे आहे.

फिर्यादी हरीचंद गोविंद मोहिते(६५) रा.गोडवना नगर यांचा फर्निचर चा व्यवसाय असून ते मोठ्या शहरातून तयार फर्निचर विकत घेऊन ग्राहकाना विकत असते.सध्या त्यांना फर्निचर चे दोन तीन ऑर्डर मिळाल्या मूळे फर्नीचर विकत आणण्याकरिता हरीचंद्र मोहिते हे आपली पत्नी पंचफुला मोहिते यांचा सोबत टाकळघाट येथील बँक ऑफ इंडिया मध्ये येऊन ६५ हजार रुपयांची रक्कम काढली.

बँक मधून पैसे काढून बाहेर येताच आरोपी शेख आरीफ मो.खलीप (३५) रा.भोईपुरा कामठी व त्याचा साथीदार यांनी हरीचंद यांचा हातात असलेली रक्कम हिसकावून पळ काढला.लगेच नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देवून एमआईडीसी पोलिसांनी खाकीचा दनका दाखवित विचारपुस सुरु केली असता दूसरा कोणीच साथीदार नसल्याची खोटी बतावणी आरोपी करीत होता.

सीसीटीवी फुटेज तपासून दिसत असलेल्या आरोपी च्या शोधात डीबी पथकाचे इकबाल शेख,प्रफुल राठोड,शैलेंद्र नागरे,रमेश नागरे गुप्त महितीच्या आधारावर कामठी येथे पोहचले असता त्यांना तीसरा आरोपीचा समावेश असल्याची माहिती मिळाली.त्याच्या राहत्या घरी नागपुर येथे पोहचले असता दरवाजा बंद दिसला.त्यानन्तर दूसरा आरोपी हा पहिल्या आरोपीला नागपुर मेडिकल येथे भेटायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याठिकाणी सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून विचारणा केली असता घटनेच्या दिवशी मी गाडी घेवून उभा असून त्याला मदत करत होतो अशी कबूली दिली.

घटनेच्या दिवशी तपासलेल्या सीसीटीवी मधील दिसत असलेला चेहरा हा तिसऱ्या आरोपी चा असल्याने त्या आरोपीला लवकरच पकडण्यत येईल अशी माहिती डीबी पथकाचे इकबाल शेख यानी दिली.

.संदीप बलविर