Published On : Fri, Oct 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

गांधी जयंतीनिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदी कल्याण दिन

बंद्यांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ; गीते, नाटिकांतून गांधी-शास्त्रींच्या विचारांना उजाळा
Advertisement

गांधी जयंतीनिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदी कल्याण दिन उत्साहात

नागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदी कल्याण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. बंद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधींच्या विचारांमध्ये अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या सुधारणेला आणि पुनर्वसनाला महत्त्व देण्यात आले होते. याच विचारांच्या आधारे नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कौशल्य विकास प्रशिक्षण, कलाशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी होण्यासाठी तयार केले जाते.

यंदाच्या कार्यक्रमात बंद्यांकडून स्वरचित गीते, महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित गीते तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून बंद्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, गांधी-शास्त्रींच्या विचारांनाही उजाळा मिळणार आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे ब्रीदवाक्य ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ असून, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षक वैभव आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी भोसले, निमजे, लोमटे आणि शिंदे यांनी परिश्रम घेतले. बंद्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम रोहन बच्छाव यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.