कोलकाता : ‘मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम 29 जुलै रोजी आहे. . याआधी, गुरुवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मोठी टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, ‘कोणताही धर्म इतरांच्या शांततेला भंग करून प्रार्थना करू नये असे सांगत नाही. त्यामुळे मोहरममध्ये ढोल वाजवता येत नाहीत. ढोल वाजवण्याच्या वेळेचे नियमन करणारी सार्वजनिक सूचना पोलिसांनी जारी करावी.
एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, मुख्य न्यायमूर्ती टीएस यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला परवानगी असलेल्या पातळीच्या संदर्भात ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाने केली ‘ही’ सूचना:
सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ढोल वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. सकाळी शाळेत जाणारी मुलं असतील. परीक्षा होतील. वृद्ध आणि आजारी लोक देखील असतील. साधारणपणे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास द्या. सायंकाळी सात वाजल्यानंतर ढोल वाजवू नयेत.
रात्री उशिरापर्यंत वाजवले जातात ढोल-
याचिकाकर्त्याने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, त्यांच्या परिसरात मोहरम सणाच्या निमित्ताने गुंड रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवत असतात. पोलिसांकडून मदत मागितली असता, न्यायालयाचा आदेश घेऊन येतो, असे सांगून ते परतले.
आता गटांना घ्यावी लागणार परवानगी –
ढोल वाजवण्यासाठी संघटित गटांना परवानगी घ्यावी लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यांची जागाही निश्चित केली जाईल. याशिवाय कालमर्यादाही निश्चित केली जाईल. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल.