Published On : Fri, Nov 17th, 2017

स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली


मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार सर्वश्री संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, श्रीमती पुनम महाजन, आमदार सुनील राऊत, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे आदींनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली.