Published On : Wed, May 17th, 2017

सप्तखंजेरीवादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर चाकूहल्ला

Advertisement

मुंबई: सुप्रसिद्ध सप्तखंजेरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका माथेफिरूनं चाकूहल्ला त्यांच्यावर नायगाव दादर परिसरात हल्ला केला आहे. 12 मे रोजी ही घटना घडली आहे. यात सत्यपाल महाराज जखमी झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर लगेच आयोजक सतर्क झाल्यानं पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, नायगाव दादर इथं बुद्ध जयंती निमित्त सत्यपाल महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर काही युवक फोटो काढण्यासाठी मंचावर आले. महाराजांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्याचवेळी तोंडाला पट्टी बांधून एकजण महाराजांसमोर आला. त्यानेही फोटो काढण्याचा बहाणा करत महाराजांच्या मानेला जोरात दाबले आणि पोटात चाकूचे वार केले.

सत्यपाल महाराजांवर हल्ला झाल्याचं लक्षात येताच आयोजकांनी हल्लेखोरास ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं, हल्यानंतर सत्यपाल महाराजांना उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव कुणाल किशोर जाधव असल्याचे सांगण्यात येते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराजांनी आपण सुखरूप असल्याचे सांगितले. तसंच हल्ला करणारा व्यक्ती कोणत होता, हे आपल्याला माहीत नाही, मी कीर्तन चांगले केले होते. कार्यक्रमानंतर त्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला, असे सत्यपाल महाराज म्हणाले.

खुमासदार शैैली आणि हलक्या फुलक्या विनोदातून सत्यपाल महाराज समाज प्रबोधनाचं काम करतात. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा प्रबोधनाचा वारसा ते चालवतात. व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज आपल्या पुरोगामी विचारसरणीतून प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement