Published On : Wed, Mar 11th, 2020

बहुजन क्रांती मोर्चाचे प्रदर्शन मिरवणूक ,तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर

Advertisement

कामठी :-बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने एन आर सी व सी ए ए च्या विरोधात बॉयकॉट आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 4 मार्च रोजी खलाशी लाईन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बहुजन मुक्ती मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त संघ कामठी, छावा मराठा संघटन सत्यशोधक संघ कन्हान, बिरसा मुंडा संघटना, राष्ट्रीय मजदूर संघ आदींच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते याच आंदोलनाचा दुसरा टप्प्यात आज 11मार्च ला मिरवणूक प्रदर्शनी करण्यात आली.

देशभरात एनपीआर चा बहिष्कार करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने बॉयकोट आंदोलन पाच टप्प्यात करण्यात येणार आहे तर आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात एकदिवसीय धरणे आंदोलन केल्या नंतर आज मिरवणूक प्रदर्शनी केल्यानंतर तहसिल कार्यालयात जाऊन तहसीलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसांगी बहुजन मुक्ती मोर्चा चे हेमलताताई पाटील, भन्ते बुद्धरत्न संबोधी, कामठी महिला संघ अध्यक्ष विद्याताई भीमटे, सेवानिवृत्त संघ अध्यक्ष दुर्योधन मेश्राम, छावामराठा संघटन चे जिल्हा अध्यक्ष नीयाज सिंघनिया,आदी संघटनेतील शिवेंद्र मसराम, रजनीश मेश्राम, विजय पाटील, मजहर इमाम,आणिक जकी आदी उपस्थित होते
संदीप कांबळे

Advertisement
Advertisement